Dhanshri Shintre
एअरटेल विविध श्रेणीतील रिचार्ज प्लॅन देते, किफायतशीर पर्यायांपासून ते प्रीमियम सेवांपर्यंत, ज्यामुळे प्रत्येक ग्राहकासाठी योग्य योजना उपलब्ध आहेत.
आम्ही एअरटेलच्या सर्वात किफायतशीर प्लॅनबद्दल बोलत आहोत, जो तुमचे सिम कार्ड सक्रिय ठेवण्याची सुविधा देतो.
एअरटेलचा सर्वात किफायतशीर ₹१९९ प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध असून, यात कॉलिंग, डेटा व एसएमएससह सर्व सुविधा दिल्या जातात.
₹१९९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि एकूण २ जीबी डेटा मिळतो.
या प्लॅनसोबत अतिरिक्त सुविधा दिल्या जातात, ज्यात स्पॅम संरक्षणाचा समावेश असून ते यूजर्सना अनावश्यक कॉल्स आणि मेसेजपासून सुरक्षित ठेवते.
Perplexity Pro AI ची वार्षिक किंमत ₹१७,००० असली तरी, कंपनी हा अॅक्सेस आपल्या रिचार्ज प्लॅनसोबत पूर्णपणे मोफत देत आहे.
कंपनीकडे २८ दिवसांचा ₹२१९ प्लॅनही आहे, ज्यात ग्राहकांना ३ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.
₹२९९ च्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जाते.