Sakshi Sunil Jadhav
एअरटेलने 200 रुपयांचा नवीन प्रीपेड अॅड-ऑन प्लॅन लॉन्च केला असून, तो अतिरिक्त डेटा आणि OTT मनोरंजनासाठी उपयुक्त आहे.
तर या प्लॅनची एकूण वैधता 28 दिवसांची असून संपूर्ण कालावधीत मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येतो.
ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 30GB 4G हाय-स्पीड डेटा मिळतो.
ज्या भागात Airtel 5G सेवा उपलब्ध आहे, तेथे पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा वापरता येतो.
तुम्हाला या प्लॅनमध्ये 149 रुपयांचे 28 दिवसांचे JioHotstar Mobile सबस्क्रिप्शन मोफत मिळते. यावर लाइव्ह स्पोर्ट्स, चित्रपट आणि वेब सिरीज पाहता येतात.
Airtel Xstream Play Premium द्वारे Sony LIV, Lionsgate Play, Aha Premium, Chaupal, SunNXT यांसह 18 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मचा प्रवेश मिळतो.
30GB डेटा संपल्यानंतर प्रत्येक MB डेटासाठी 50 पैसे आकारले जातील.
हा स्वतंत्र रिचार्ज नसून अॅड-ऑन प्लॅन आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी आधी वैध Airtel प्रीपेड प्लॅन सक्रिय असणे आवश्यक आहे.
जास्त डेटा, अनलिमिटेड 5G आणि अनेक OTT सबस्क्रिप्शनमुळे Airtel चा हा प्लॅन 200 रुपयांच्या श्रेणीत Jio च्या ऑफर्सला थेट स्पर्धा देणारा मानला जात आहे.