Dhanshri Shintre
एअरटेलकडे विविध प्रीपेड प्लॅन्स आहेत आणि आज आपण त्यापैकी एका किफायतशीर रिचार्ज पर्यायाची माहिती जाणून घेणार आहोत.
एअरटेलचा किफायतशीर वार्षिक प्लॅन उपलब्ध आहे. फक्त ₹1849 मध्ये पूर्ण वर्षाची वैधता आणि सेवांचा लाभ मिळणार, बजेट युजर्ससाठी फायदेशीर आहे.
एअरटेलचा ₹1849 प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, ज्यात एसटीडी आणि रोमिंग कॉल्सचा समावेश आहे.
₹1849 च्या एअरटेल प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 3,600 एसएमएस मिळतात, जे वर्षभर विविध कम्युनिकेशनसाठी वापरता येतात.
या किफायतशीर एअरटेल प्लॅनमध्ये मोबाइल डेटा उपलब्ध नाही. सतत वायफाय वापरणाऱ्या आणि इंटरनेटची गरज कमी असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
ड्युअल सिम वापरणारे यूजर्सही हा स्वस्त एअरटेल प्लॅन घेत फायदा करू शकतात. त्यामुळे दोन्ही नंबरवर महाग रिचार्ज करण्याची गरज कमी होते आणि खर्च वाचतो.
एअरटेल यूजर्सना स्पॅम कॉलपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष अलर्ट सुविधा देते. हे चेतावणी संदेश कॉल येताच रिअल-टाइममध्ये दिसतात आणि धोका ओळखण्यास मदत करतात.
एअरटेल यूजर्सना फ्री हॅलोट्यून्स सुविधा मिळते. यात १२ महिन्यांपर्यंत ट्यून वापरता येते, प्रत्येक ट्यूनची वैधता ३० दिवसांची असते.
एअरटेल आपल्या यूजर्सना परप्लेक्सिटी प्रो एआयची मोफत सबस्क्रिप्शन देते, ज्याची वार्षिक किंमत साधारण ₹१७,००० आहे.