Saam Tv
पहिलीच फ्लाईट असल्याने मनात भीती किंवा उत्सुकता असणे साहजिक आहे. पण छोट्या-छोट्या नियमांची माहिती नसल्यास धावपळ होऊ शकते.
ट्रेनप्रमाणे एअरपोर्टवर ऐन वेळी पोहोचून चालत नाही. डोमेस्टिक फ्लाईटसाठी किमान २ तास आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी ३ ते ४ तास आधी एअरपोर्टवर पोहोचावे. फ्लाईटच्या ४५ मिनिटे आधी बोर्डिंग सुरू होते आणि २५ मिनिटे आधी गेट बंद होतात.
एअरपोर्टमध्ये प्रवेश करण्यासाठी ई-तिकीट आणि वैध ओळखपत्र पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा वोटर आयडी असणे आवश्यक आहे.
१५ किलोपर्यंतचे मोठे सूटकेस काऊंटवर जमा होते.
७ किलोपर्यंतची छोटी बॅग किंवा लॅपटॉप बॅग सोबत नेऊ शकता.
पॉवर बँक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेहमी केबिन बॅगेजमध्येच ठेवाव्या लागतात.
विमान प्रवासाच्या ४८ तास आधी एअरलाइनच्या वेबसाईट किंवा ॲपवरून 'वेब चेक-इन' करून घ्या. यामुळे तुम्हाला हवी ती सीट निवडता येते आणि एअरपोर्टवर लांब रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचतो.
सिक्युरिटी चेकदरम्यान बॅगेजमधून लॅपटॉप, मोबाईल, पॉवर बँक बाहेर काढून ट्रेमध्ये ठेवावे लागतात. तसेच बेल्ट, जॅकेट, पर्स आणि घड्याळ काढून एक्स-रे मशीनमधून जावे लागते.
सिक्युरिटी तपासणी झाल्यानंतर बोर्डिंग पासवर दिलेला 'गेट नंबर' तपासा. डिस्प्ले स्क्रीनवर फ्लाईटचे अपडेट्स पाहत योग्य गेटवर पोहोचा. अनाउंसमेंट झाल्यानंतर क्रू मेंबर्स तुमचे तिकीट स्कॅन करून विमानात प्रवेश देतात.
एयरोब्रिज किंवा बसद्वारे विमानात पोहोचल्यानंतर एअरहोस्टेसला बोर्डिंग पास दाखवून तुमची सीट शोधा.
सीट बेल्ट व्यवस्थित लावा आणि सूचनांचे व्यवस्थित पालन कराा
NEXT : चहात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं? तूप घातलेला चहा का, कोणी प्यावा, समजून घ्या