Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवासांमध्ये दिवाळी सणाची धामधूम सुरू होणार आहे. येत्या १८ ऑक्टोबर २०२५ पासून दिवाळी सण सर्वत्र साजरा केला जाईल.
दिवाळीत फटाके फोडले जातात. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण वाढते.
प्रदुषणाच्या प्रभावापासून घराचे संरक्षण करण्यासाठी शुद्ध हवा देणारी झाडे तुम्ही घरात लावू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप असणे शुभ असते. तुळशीचे रोप ऑक्सिजन देते हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून घेते. तुळशीचे रोप लावल्याने हवा शुद्ध राहण्यास मदत होते.
स्पायडर प्लांट हे प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. स्पायडर प्लांट एक इनडोअर प्लांट आहे. त्यामुळे दिवाळीतील प्रदुषणापासून घराचे संरक्षण होईल.
मनीप्लांट आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरात लावले जाते. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मनीप्लांट उपयुक्त आहे.
ड्रॅगन ट्री हे हिरवेवागार झाड घरातील हवा शुद्ध रहावी म्हणून लावले जाते. ड्रगन ट्रीला मध्यम सूर्यप्रकशाची आवश्यकता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.