AC Side Effects: एसीच्या थंड हवेमुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम कोणते? जाणून घ्या कारणे

Dhanshri Shintre

एअर कंडिशनर

एअर कंडिशनर हा अनेक जणांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

एसी खोली

अनेक लोक घरात किंवा ऑफिसमध्ये बरेच तास वातानुकूलित (एसी) खोलीत राहतात.

दुष्परिणाम

परंतु डोळ्यांवर त्याचे दुष्परिणाम हळूहळू जाणवू लागतात. ते समजून घेणे गरजेचे आहे.

डोळ्यांची समस्या

एसीमध्ये सतत बसल्यामुळे कोरड्या डोळ्यांची समस्या अधिक तीव्र होऊ शकते, बंद खोलीत एसी चालू असताना त्यामधून धूळ, परागकण, बुरशी यांसारखे घटक हवेत पसरतात.

अॅलर्जी

यामुळे डोळ्यांच्या आसपास खाज, पुरळ किंवा अॅलर्जी होण्याचा धोका वाढलो.

काँटॅक्ट लेन्स

विशेषतः ज्यांना आधीपासूनच डोळ्यांची कोरडेपणाची तक्रार आहे किंवा जे काँटॅक्ट लेन्स वापरतात, त्यांच्यासाठी ही स्थिती अधिक गंभीर ठरते.

दृष्टी धूसर होणे

डोळ्यांतील स्नेहक घटक कमी झाल्यामुळे डोळ्यांचा पृष्ठभाग सुरळीत राहत नाही. यामुळे ब्लर व्हिजन म्हणजेच धूसर दिसणं हे लक्षण दिसू शकते.

नैसर्गिक ओलावा कमी होणे

एसी शरीरातून घाम आणि उष्णता कमी करत असतो, पण त्याचबरोबर डोळ्यांसह त्वचा, घसा, नाक यांतील नैसर्गिक ओलावाही कमी करतो.

डोळ्यांमध्ये संसर्गाचा धोका

डोळ्यातील अश्रूच्या थरात जेव्हा ओलावा कमी होतो, तेव्हा तो थर संक्रमणापासून संरक्षण करण्यास कमी प्रभावी ठरतो.

लक्षणांकडे दुर्लक्ष नको

डोळे चुरचुरणे, कोरडेपणा यावर स्नेहक (lubAicating) डोळ्यांचे थेंब उपयोगी ठरू शकतात. मात्र, जर सतत डोळ्यांत वेदना, धूसर दृष्टी, प्रकाशाची भीती किंवा तीव्र खाज असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला तातडीने घ्या.

अधिक गंभीर

स्वतःहून औषधं घेणं धोकादायक ठरू शकतं. कारण त्याने मूळ आजार दुर्लक्षिला जाऊ शकतो. तथापि, कालांतराने अधिक गंभीर स्वरूपात ही समस्या समोर येऊ शकते.

NEXT: बाटलीतून बाळाला दूध पाजल्याने कोणते आजार होतात?

येथे क्लिक करा