Shreya Maskar
शिर्डी हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे, जे मुंबईपासून साधारण २४० किमी अंतरावर स्थित आहे. येथे परदेशी पर्यटकही साईबाबांच्या दर्शनाला येतात.
शिर्डी हे महान संत श्री साईबाबा यांचे पवित्र निवासस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे वीकेंडला कुटुंबासोबत फिरण्याचा नक्की प्लान करा.
शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर (समाधी मंदिर) हे नागपूरचे एक श्रीमंत भक्त श्रीमंत गोपाळराव बुटी यांनी बांधले होते. या वास्तूचे बांधकाम मुळात १९१५ च्या सुमारास एक विश्रांतीगृह म्हणून सुरू झाले होते, पुढे १९१८ मध्ये बाबांच्या महासमाधीनंतर हे मंदिर पूर्ण झाले.
मुंबई ते शिर्डी प्रवास अत्यंत सोयीस्कर आहे. यासाठी खाजगी एसी/नॉन-एसी बसेस, एसटी बसेस आणि खाजगी गाड्या असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई ते शिर्डीला बसने साधारण ७ ते ८ तास पोहचाल, तर प्रायव्हेट गाडीने सुमारे चार किंवा साडेचार तासात पोहचला.
मुंबई ते शिर्डी जाण्यासाठी अनेक ट्रॅव्हलच्या बस उपलब्ध आहेत. यात एसी आणि नॉन-एसी, स्लीपर यांचा समावेश असतो. त्यानुसार दर ₹३५० ते ₹१,५०० (किंवा त्याहून अधिक) असू शकतात. बोरीवली, अंधेरी, दादर, ठाणे आणि वाशी ही प्रमुख ठिकाणे आहेत.
तुम्ही जर प्रायव्हेट गाडी करून जाणार असाल तर प्रवास अधिक जलद होईल. मुंबई-नाशिक एक्सप्रेसवे (NH 160) मार्गे यासाठी साधारण ४ ते ५ तास लागतात. प्रायव्हेट गाडीच्या भाड्याचे दर ₹२,५०० ते ₹६,५०० च्या दरम्यान असतात.
तुम्ही वंदे भारत एक्सप्रेसने 5 तासांत प्रवास पूर्ण करू शकता. तसेच इतर काही ट्रेन्स आहेत ज्या रात्रीचा प्रवास करतात. त्याची माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळेल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.