Shreya Maskar
अगुंबे हे कर्नाटकच्या पश्चिम घाटातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. अगुंबेला 'दक्षिण भारताचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाते.
अगुंबे घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तसेच येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
अगुंबे येथे जाण्यासाठी उडुपी (Udupi) रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे अगुंबेपासून सुमारे ५० ते ५५ किलोमीटर अंतरावर आहे. तिथून तुम्ही टॅक्सी किंवा स्थानिक बसने अगुंबेला पोहोचू शकता.
अगुंबे येथे अतिवृष्टी होते, म्हणून या ठिकाणाला 'दक्षिण भारताचे चेरापुंजी' असे म्हणतात. येथे निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
अगुंबे ही भारताची कोब्रा राजधानी आहे. कारण तेथे किंग कोब्रा आणि इतर सापांची संख्या खूप जास्त आहे. तसेच हे ठिकाण सापांच्या संरक्षणासाठी आणि अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे.
अगुंबे हे ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे धबधब्यांच्या आणि उंच शिखरांचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि दृश्ये अविस्मरणीय असतात.
अगुंबे गोव्याजवळील हिल स्टेशन आहे. तसेच दांडेली, चिकमंगळूर, कूर्ग आणि केम्मनगुंडी ही सर्व ठिकाणे गोव्याच्या आसपासची सुंदर हिल स्टेशन्स आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.