ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणी शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. पाणी हे शरीरातील तापमान नियंत्रित ठेवते, तसेच पचनक्रिया सुधारते आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
या वयातील मुलांनी दिवसाला कमीत कमी 1 ते 1.3 लिटर पाणी प्यावे. तसेच दूध, सूप, फळांचा रस यामधूनही पाण्याची गरज पूर्ण होते. वारंवार थोडेथोडे पाणी द्यावे.
या वयोगटातील मुलांनी रोज 1.5 ते 1.7 लिटर पाणी प्यावे. बाहेर खेळताना पाण्याची तहान लागते तेव्हा थोडे थांबून मग पाण्याचे प्रमाण वाढवावे.
या वयात शरीराची वाढ झपाट्याने होत असते.मुलींनी 2 ते 2.1 लिटर पाणी प्यावे तर, मुलांनी 2.3 ते 2.4 लिटर पिणे गरजेचे आहे.
या वयातील लोकांनी म्हणजेच महिलांनी 2.5 ते 2.7 लिटर पाणी प्यावे आणि पुरुषांनी 3 ते 3.5 लिटर पाणी प्यावे. तसेच यापेक्षा अधिकसुध्दा पाणी पिऊ शकता.
या वयात मेटाबॉलिझम थोडा मंद होतो. महिलांनी 2.3 ते 2.5 लिटर आणि पुरुषांनी 2.8 ते 3 लिटर पाणी पिणे योग्य ठरते.
ज्येष्ठांनी दिवसाला 2 ते 2.5 लिटर पाणी प्यावे. या वयात तहान कमी लागू शकते म्हणून वेळोवेळी थोडेथोडे पाणी पिण्याची सवय लावावी.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे शरिरासाठी फायदेशीर मानले जाते. एकदम जास्त न पिता थोडेथोडे पाणी प्या तहान लागण्याची वाट न पाहता पाणी प्यावे.