साम टिव्ही ब्युरो
दुपारच्या वेळी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे की चांगलं? याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
तज्ज्ञाचं म्हणणं आहे की, दिवसा झोपल्याने झोपल्याने आणि रात्री जागरण केल्याने रक्तदाब, हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
दुपारी झोपण्याचे अनेक फायदे असले तरीही याचे काही तोटेही आहेत.
दुपारी झोपल्यामुळे आपल्याला कफ, शिंका येणे आणि अंगात आळस भरणे अशा समस्या निर्माण होतात.
दुपारी झोपणे शक्यतो टाळावे असे आयुर्वेदात आवर्जून सांगितले जाते.
एखादी व्यक्ती दुपारी 60 मिनिटांपेक्षा जास्त आणि दोन तासापर्यंत झोपून राहत असेल, तर त्याच्या रात्रीच्या झोपेत दोष असतात.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि पचन आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे असे करणे टाळावे.
दुपारी थोडा वेळ झोप घेतली जाऊ शकते. हे लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि भरपूर काम करणाऱ्या लोकांसाठी योग्य आहे.