Ruchika Jadhav
अनेक व्यक्तींना दुपारी जेवणानंतर झोप येते. दुपारची झोप चांगली की वाईट याबाबत तज्ञांनी विविध गोष्टी सांगितल्या आहेत.
दुपारी जेवण केल्यानंतर झोपल्यावर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. व्यक्तींना अपचन आणि गॅस होतात.
ज्या व्यक्ती पहाटे लवकर उठतात त्यांनी दुपारी थोडीशी झोप घेतल्यास काहीच हरकत नसते.
अनेकदा दुपारी झोपल्याने व्यक्तींना रात्री लवकर झोप येत नाही.
दुपारी झोपल्याने व्यक्तींना लठ्ठपणा देखील येऊ शकतो.
उन्हाळ्यात रात्र लहान असते. त्यामुळे झोप पूर्ण होण्यासाठी दिवसा झोपावे, असा सल्ला देखील अनेक व्यक्ती देतात.
दुपारी जेवण केल्यानंतर झोपल्याने छातीत जळजळ होण्याच्या समस्या निर्माण होतात.