Ruchika Jadhav
आज म्हणजे २१ मे रोजी दरवर्षी देशभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
आळस घालवण्यासाठी आपण सर्वजण सकाळी नाश्त्याची सुरुवात चहाचा घोट घेऊन करतो.
सध्या काही व्यक्ती आरोग्यासाठी हर्बल आणि ग्रिन टी देखील पितात.
चहाप्रेमी एकत्र आले की संधी मिळेल तिथे त्यांची एक तरी टी पार्टी होतेच.
काही व्यक्ती चहा प्यायल्यानंतर पाणी पितात. पाणी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो.
गरमगरम चहावर पाणी प्यायल्यानंतर दातांवर त्यांचा परिणाम होतो. दात दुखू लागतात.
ज्या व्यक्तींना बीपी आणि शुगरच्या समस्या असतात त्यांना चहावर पाणी प्यायल्याने नाकातून रक्त देखील येऊ शकते.
चहावर पाणी प्यायल्याने अल्सरची वाढ होण्याची शक्यता असते.