Manasvi Choudhary
नवरा- बायकोच्या नात्यात केवळ प्रेम असणं चालत नाही तर एकमेकांना समजून घेणे अत्यंत महत्वाचे असते.
प्रत्येक पत्नीला तिच्या पतीकडून काही भावनिक आणि मानसिक गोष्टींची अपेक्षा असते, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट होते.
पत्नीला महागड्या भेटवस्तूंपेक्षा पतीचा 'वेळ' अधिक हवा असतो. दिवसभरात किमान १५-२० मिनिटे मोबाईल बाजूला ठेवून तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा.
घरातील कामे असो किंवा तिची नोकरी, पत्नी करत असलेल्या कष्टांचे कौतुक केल्यास तिचा उत्साह वाढतो.
घर सांभाळणे ही केवळ पत्नीची जबाबदारी नाही. जेव्हा नवरा स्वतःहून घरकामात मदत करतो, तेव्हा पत्नीला छान वाटते.
कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. आपल्या पतीच्या मनात काय चालले आहे किंवा तिचे निर्णय काय आहेत एकमेकांना माहित असणे महत्वाचे आहे.
कधीतरी अचानक बाहेर फिरायला नेणे, तिच्या आवडीच्या गोष्टी आणणे, सरप्राईज प्लान करणे असं केल्याने पत्नी खूश होते.