Surabhi Jayashree Jagdish
सामान्यतः कारमधील ब्रेक फ्लुइड दर दोन वर्षांनी बदलण्याचा सल्ला दिला जातो. मात्र गाडीच्या मॉडेलनुसार हा कालावधी वेगळा असू शकतो. त्यामुळे केवळ ठरावीक वर्षांवर अवलंबून न राहता कारच्या सर्व्हिस मॅन्युअलमधील माहिती तपासणं महत्त्वाचं आहे.
काही कारमध्ये ब्रेक फ्लुइड बदलण्याचा कालावधी तीन वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतो. हा कालावधी कारची रचना, वापर आणि देखभाल यावर अवलंबून असतो.
ब्रेक फ्लुइड कधी बदलायचं याची अचूक माहिती मिळवण्यासाठी कारच्या सर्व्हिस मॅन्युअलचा संदर्भ घ्या. गाडीच्या विशिष्ट मॉडेलसाठी ब्रेक फ्लुइड बदलण्याचा कालावधी आणि देखभालीच्या सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे सर्व्हिस मॅन्युअलमधील वेळेनुसासार, ब्रेक फ्लुइडची तपासणी आणि बदल करणं योग्य ठरतं.
ब्रेक फ्लुइड कालांतराने वातावरणातील ओलावा शोषून घेऊ शकतो. त्यामुळे त्यामध्ये बदल होऊन ब्रेकिंग सिस्टिमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच नियमित सर्व्हिसिंगदरम्यान ब्रेक फ्लुइडची स्थिती तपासणं महत्त्वाचं आहे.
ब्रेक पेडल नेहमीपेक्षा जास्त सॉफ्ट किंवा स्पॉन्जीसारखे वाटत असल्यास ब्रेक सिस्टिमची तपासणी करून घ्यावी. अशा वेळी केवळ ब्रेक फ्लुइडकडेच पाहण्याऐवजी संपूर्ण ब्रेकिंग सिस्टिम तपासणं आवश्यक असतं.
ब्रेक लावल्यानंतर गाडी नेहमीपेक्षा जास्त अंतर गेल्यावर थांबत असेल तर ही बाब गांभीर्याने घ्यावी. अशा परिस्थितीत ब्रेक फ्लुइडसह ब्रेक पॅड, डिस्क आणि इतर ब्रेक घटकांची तपासणी करणं आवश्यक ठरू शकतं. ब्रेकिंगची कार्यक्षमता कमी झाल्याचं जाणवत असल्यास वाहनाची तपासणी लवकर करून घेणं योग्य आहे.
ब्रेक फ्लुइडचा रंग खूप गडद किंवा अस्वच्छ दिसत असल्यास त्याची तपासणी करून घेणं योग्य ठरेल. कारच्या नियमित सर्व्हिसिंगवेळी ब्रेक फ्लुइडची लेव्हल आणि स्थिती तपासून घ्यावी.