Surabhi Jayashree Jagdish
मोबाईलचा सतत वापर केल्यावर बॅकग्राउंडमध्ये अनेक अॅप्स आणि सिस्टम प्रोसेसेस सुरू राहतात. ही कामं फोनच्या सिस्टम रिसोर्सेसचा काही प्रमाणात वापर करत असतात.
बॅकग्राउंडमध्ये अनेक प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही वेळा फोन पूर्वीपेक्षा स्लो काम करू शकतो. अॅप उघडताना उशीर होणं किंवा स्क्रीनवरील कमांडला वेळ लागणे असे प्रकार दिसू शकतात. अशा वेळी फोन रीस्टार्ट करणं फायदेशीर असतं.
मोबाईल रीस्टार्ट केल्यावर त्यावेळी सुरू असलेल्या तात्पुरत्या सिस्टम प्रोसेसेस पुन्हा नव्याने सुरू होतात. यामुळे बॅकग्राउंडमध्ये अडकलेल्या काही प्रक्रिया बंद होऊन सिस्टम नव्याने लोड होते. त्यामुळे फोन स्लो काम करू शकत नाही.
सामान्य वापरासाठी मोबाईल आठवड्यातून साधारण एकदा रीस्टार्ट करणं पुरेसं ठरू शकतं. यासाठी दररोज फोन बंद करून पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता नसते. तुमचा फोन व्यवस्थित काम करत असेल तर आठवड्यातून एकदा रीस्टार्ट करण्याची सवय ठेवू शकता.
मोबाईलमध्ये कोणतीही अडचण जाणवत नसेल तर तो दररोज रीस्टार्ट करण्याची आवश्यकता नाही. फोनचा नियमित वापर सुरू ठेवताना सिस्टम स्वतः अनेक अपडेट करतो. त्यामुळे रोज रीस्टार्ट करण्याऐवजी गरजेनुसार किंवा आठवड्यातून एकदा रीस्टार्ट करणे पुरेसे आहे.
मोबाईलमध्ये सिस्टम अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर फोन रीस्टार्ट करणं आवश्यक असतं. रीस्टार्ट केल्यावर अपडेटशी संबंधित सिस्टम बदल लागू होण्यास मदत होते. त्यामुळे अपडेट पूर्ण झाल्यानंतर फोनने स्वतः रीस्टार्ट करण्यास सांगितलं तर तसं करा.
फोन नेहमीपेक्षा जास्त गरम होत असेल तर एकदा रीस्टार्ट करून पाहू शकता. त्याचप्रमाणे बॅटरी नेहमीपेक्षा वेगाने कमी होत असल्याचे जाणवल्यास रीस्टार्ट करणं हा प्राथमिक उपाय करू शकता.