Ruchika Jadhav
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला आणि वस्तूला एक वेगळं महत्व आहे.
आपल्या घरामध्ये आणलेल्या झाडूची पूजा केल्यानंतरच तो घरामध्ये वापरला जातो.
हिंदू धर्मात घरातील झाडूला लक्ष्मीचं रुप मानलं जातं.
आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता झाडूने होते. त्यामुळे याची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते.
आपल्या घरातील झाडून नेहमी कोपऱ्यात बाहेरील व्यक्तीच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.
वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी घराला झाडू मारू नये.
घरातील एखादी व्यक्ती महत्वाच्या कामासाठी किंवा पाहूने घरातून बाहेर पडल्यावर लगेच झाडू मारू नये.
वास्तुशास्त्रातील हे नियम झाडूच्या बाबतीत पाळल्यास घरात धनलक्ष्मीचा कायम वर्षाव राहतो.