Dhanshri Shintre
आज कार शिकणे गरजेचं झालंय. घाबरू नका, या सोप्या टिप्स फॉलो करा आणि १० दिवसांत कार शिका.
कार चालवण्याचं कौशल्य तुम्हाला स्वातंत्र्य देतं आणि गरजेच्या वेळी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही.
मोठ्या शहरांपासून लहान गावांपर्यंत ड्रायव्हिंग स्कूल उपलब्ध आहेत. कार शिकताना अनुभवी ट्रेनर निवडा, जो योग्य नियम आणि मार्गदर्शन देईल.
ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुम्ही 10-15 दिवसांचा किंवा महिनाभराचा कोर्स करू शकता, ज्यामध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकल शिक्षण समाविष्ट असते.
तुम्ही युट्यूबवरून कारचे बेसिक कंट्रोल्स शिकू शकता. स्टीअरिंग, ब्रेक, क्लच, अॅक्सिलरेटर आणि गिअर यांचा योग्य सराव करा आणि समजून घ्या.
कार शिकताना सुरुवातीला चुका होणं साहजिक आहे. त्यामुळे घाई न करता संयम ठेवा आणि मन शांत ठेवून गाडी चालवण्याचा सराव करा.
गाडी शिकताना सुरुवातीसाठी शांत आणि मोकळी जागा निवडा, जेथे रहदारी कमी असेल. अशा ठिकाणी प्रॅक्टिस केल्यास भीती वाटत नाही.
वाहन चालवताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. नेहमी सीट बेल्ट लावा, योग्य अंतर ठेवा आणि वेग मर्यादेत ठेऊन वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा.