Shruti Vilas Kadam
अदिती राव हैदरीने पुरस्कार समारंभात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली क्रीम कलरची रेशमी साडी घातली होती.
साडीवर पर्ल डिटेलिंग आहे आणि तिची बॉर्डर काळ्या रंगाची असून ती तिच्या ब्लाउजशी जुळते आहे.
तिचा ब्लाउज काळ्या रंगाचा आहे, ज्यात लेसबॉर्डर आहे. हे साडीच्या साधेपणाला आणि स्टाइलिश करतात.
अॅक्सेसरी म्हणून ती स्टेटमेंट चोकर, स्टड इयररिंग्स आणि स्टॅक केलेल्या कड्यांचा वापर केला आहे.
तिच्या मेकअपमध्ये काळी बिंदी आहे जी तिच्या पारंपरिक लूकमध्ये एक क्लासिक टच देते.
हेअरस्टाईलमध्ये तिने स्लीक बन बांधला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
या समारंभात तिला सुपरवुमेनिया ग्रेसफुल वॉरियर पुरस्कार दिला गेला, आणि तिच्या पती सिद्धार्थने तिच्या फोटोवर प्रेमाने “Marjaavaaaaaaaan” असं कमेंट केलं.