Manasvi Choudhary
यंदाचा वर्ष हा अधिकमास आहे. हिंदू पंचांगानुसार, ज्या वर्षी ज्येष्ठ महिना दोनदा येतो त्या वर्षात अधिकमास येतो.
हिंदू धर्मात अधिकमासाला विशेष महत्व आहे. दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. हिंदू धर्मात आणि पंचांगानुसार 'अधिकमास' या महिन्याला अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते.
यावर्षी अधिकमासाची सुरूवात 17 मे 2026 रोजी झाली असून 15 जून 2026 रोजी समारोप आहे.
अधिकमास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा केली जाते.
अधिकमासात कोणतेही शुभ कार्ये केले जात नाही, या महिन्यात लग्न, मुंज आणि वास्तुशांती किंवा कोणतेही कार्यक्रम करत नाही.
अधिकमास या महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हणतात. या महिन्यात जावयाला विष्णूचे रूप मानून घरी बोलावले जाते. जावयाची ओवाळणी केली जाते आणि नवीन कपडे व भेटवस्तू दिल्या जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.