Chetan Bodke
अभिनयाकडून राजकीय क्षेत्रात वळालेल्या नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा आज ५० वा वाढदिवस आहे.
४ फेब्रुवारी १९७४ रोजी अभिनेत्रीचा जन्म झाला असून आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेणार आहोत.
उर्मिला मातोंडकर ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असून तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
उर्मिलाला रामगोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' चित्रपटातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, उर्मिलाची ७० कोटींच्या आसपास एकूण संपत्ती आहे.
उर्मिलाला फॅशनसोबतच महागड्या कारचीही खूप आवड आहे. तिच्याकडे बऱ्याच महागड्या कार सुद्धा आहे.
उर्मिला मातोंडकरने २०१६मध्ये १० वर्ष लहान असलेल्या उद्योगपती मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. त्याच्याकडे ही कोट्यवधींची संपत्ती आहे.
उर्मिलाकडे मर्सिडीजसह काही अलिशान कार देखील आहेत. तिच्या पतीकडेही अनेक महागड्या कार्सचं कलेक्शन आहे.