Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच चर्चेत असते. ती आपल्या सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
तेजश्री या मालिकेत स्वानंदी हे पात्र साकारत आहे. तिच्या या भूमिकेला खूप प्रेम मिळत आहे.
तेजश्री प्रधानने नुकतेच सोशल मीडियावर डिझाइनर साडीवरील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
तेजश्रीने छान डायमंड वर्क असलेली साडी नेसली आहे. त्यावर फुल हँड लव्हेंडर कलरचा ब्लाउज घातला आहे.
केस मोकळे सोडत तेजश्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.
तेजश्रीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.