Siddhi Hande
तेजश्री प्रधान ही नेहमीच आपल्या सालस आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
तेजश्री प्रधान बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एका मालिकेत दिसणार आहे.
नवीन मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे.
तेजश्रीच्या या नवीन मालिकेचं नाव वीण दोघांतली ही तुटेना असं आहे.
तेजश्रीसोबत या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेत तेजश्रीच्या पात्राचं नाव स्वानंदी तर सुबोधच्या पात्राचं नाव समर असं आहे.
तेजश्री प्रधानची ही मालिका ११ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तेजश्रीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
तेजश्री आणि सुबोध भावेची केमिस्ट्री आता चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहेत.