ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनय आणि सौंदर्याने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री श्वेता तिवारी.
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने नाव कमावलं आहे.
४५ व्या वयात देखील श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याने सर्वांंचीच झोप उडवत आहे.
श्वेता तिवारी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. कर्वी फिगरमुळे श्वेता आकर्षित करते.
नुकतेच श्वेताने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
श्वेता तिवारीने पिवळ्या साडीत खास लूक केला आहे. मोकळे केस अन् साजेसा मेकअप तिने केला आहे.
श्वेताच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव सुरू आहे नेटकऱ्यांना देखील तिचे फोटो आवडले आहेत.