Gangappa Pujari
सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.
त्यांचाच आदर्श घेत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.
श्रियाने मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.
या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
सध्या श्रियाच्या बोल्ड फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.