Gangappa Pujari
सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.
त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.
तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.
या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.
ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
सध्या श्रियाच्या साडीतील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
साडीमधील तिच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.