Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीव आतापर्यंत अनेक मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सायली ही मूळची नाशिकची आहे. तिचे लहानपणदेखील नाशिकमध्ये गेले.
सायली संजीवला खरी ओळख ही काहे दिया परदेस या मालिकेतून मिळाली. या मालिकेत ती गौरी हे पात्र साकारत होती.
सायली संजीवला आजही अनेकजण शिवची गौरी म्हणून ओळखतात.
सायली सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने नुकतेच फोटो शेअर केले आहे.
सायलीने छान ऑफ व्हाईट कलरचा पटियाला ड्रेस घातला आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट पिंक कलरची ओढणी घेतली आहे.
सायलीने कानात मोत्याचा मोठा झुमका घातला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.