Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे रूपाली भोसले.
रूपाली भोसलेने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
सोशल मीडियावर रूपाली भोसले तिच्या सौंदर्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतंच रूपालीने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंना तिने साडीतली मी खरी मी असं कॅप्शन दिलं आहे.
हिरवी साडी आणि हिरवा एम्ब्रॉयडरी ब्लाऊजमध्ये रूपालीचं सौंदर्य खुललं आहे.
साडीवर तिने दागिने, केसांत गजरा आणि हातात बांगड्या असा मराठमोळा लूक केला आहे.
रूपाली सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो पोस्ट करते. रूपाली भोसलेच्या सौंदर्याची जादू चाहत्यांना घायाळ करते.
या फोटोतील रूपालीच्या मोहक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर रूपालीच्या या नवीन फोटो चर्चा सुरू आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.