Manasvi Choudhary
'आई कुठे काय करते' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे रूपाली भोसले.
रूपाली भोसले आता पुन्हा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रूपाली भोसलेच्या नवीन मालिकेचं नाव लपंडाव आहे.
एका अनोख्या भूमिकेतून रूपाली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चाहत्यांना देखील रूपालीच्या नव्या भूमिकेची उत्सुकता आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत रूपाली संजनाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसली होती.