Siddhi Hande
अभिनेत्री मृणाल ठाकूर आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांना भूरळ घालत असते.
मृणालने मराठी, हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीत काम केले आहे.
मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावरदेखील नेहमी सक्रिय असते.
मृणालने नुकतेच सोशल मीडियावर एथनिक आउटफिटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मृणाल ठाकूरने छान व्हाईट कलरचा अनार्कली ड्रेस घातला आहे. त्यावर निळ्या रंगाची डिझाइन आहे. सोबत मॅचिंग ओढणीदेखील घेतली आहे.
मृणालने कानात डायमंड इअररिंग्स घातले आहे. हातातदेखील फुलाच्या आकाराची डायमंड रिंग घातली आहे.
मृणालने केसांची पुढच्या बाजूने वेणी घातली आहे आणि मागे पोनी बांधली आहे.
मृणालने एकदम सिंपल आणि सोबर लूक केला आहे. त्यावर साजेसा मिनिमल मेकअपदेखील केला आहे.
मृणाल ठाकूर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा सिंपल लूक सर्वांनाच आवडला आहे.