Shruti Vilas Kadam
अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नव्या फोटोशूटमध्ये मौनीने तिची फिट आणि कर्व्ही फिगर फ्लाँट केली आहे. तिच्या या लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत.
मौनी तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी नेहमीच ओळखली जाते. या फोटोमध्येही तिचा स्टायलिश आणि ट्रेंडी अंदाज पाहायला मिळाला.
वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाही मौनीने स्वतःला उत्तम प्रकारे फिट ठेवले आहे. तिच्या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या सौंदर्याचे आणि ग्लॅमरस व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे. अनेकांनी तिला 'गॉर्जियस' आणि 'स्टनिंग' अशा प्रतिक्रिया दिल्या.
'नागिन' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मौनी रॉयने बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मौनी रॉय नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ आणि खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे तिची प्रत्येक पोस्ट चर्चेचा विषय ठरते.