Chetan Bodke
बॉलिवूडच्या स्टारकिड्स पैकी एक श्रीदेवीची मोठी लेक जान्हवी कपूर आहे. जान्हवी कपूर आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करतेय.
जान्हवीने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्के केले आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...
‘धडक’ चित्रपटातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. तिला पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांमध्ये उत्तम प्रसिद्धी मिळाली.
जान्हवी स्वतःच्या मेहनतीवर कोट्यवधींची मालकीण झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती ८२ कोटींची आहे.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जान्हवीचा क्रमांक येतो. ती एका चित्रपटासाठी कोट्यवधींचे मानधन घेते.
अभिनेत्री चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरात, स्टेज परफॉर्मन्स आणि ब्रँड शूटमधून भरपूर कमाई करते.
जान्हवीचं मुंबईतल्या जुहूसारख्या अलिशान परिसरात स्वतःचं घर आहे. तिच्या त्या घराची किंमत ३८ कोटीं इतकी आहे.
जान्हवीकडे मर्सिडीज बेंझ जीएलसी, ऑडी ए6 कार आणि रेंज रोव्हर सारख्या महागड्या लक्झरी कार आहेत.
जान्हवी कपूर लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत ‘देवरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.