Siddhi Hande
हृता दुर्गुळे ही मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. हृताला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.
हृताने आतापर्यंत चित्रपट, मालिका, वेबसीरीज आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
हृता दुर्गुळेने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय की, ती मूळची मुंबईची लालबागची आहे. हृताचं बालपण हे मुंबईत गेलं.
हृता दुर्गुळे सातवीत असेपर्यंत लालबागमध्ये राहिली. तिच्या लालबागसोबत अनेक आठवणी आहे.
हृता लालबागची असल्यामुळे तिला गणेशोत्सव हा सण खूप आवडतो. हृता लहानपणी सर्व गणपतींना जायची.
हृता ही लहानपणी एकत्र कुटुंबात वाढली आहे. ती तिच्या कुटुंबासोबत लालगाबला राहायची.
हृताचे लालबाग, गणेशोत्सवावर विशेष प्रेम आहे, असं तिने मुलाखतीत सांगितलं.