Manasvi Choudhary
जेनेलिया देशमुख अभिनयासह तिच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि मराठी अशा सहा चित्रपटसृष्टीतून जेनेलियाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
आपल्या सहजसुंदर अभिनयाने जेनेलियाने खास ओळख निर्माण केली आहे.
सोशल मीडियावर जेनेलिया नेहमीच तिचे एथनिक व वेस्टर्न फोटो पोस्ट करत असते.
सध्या जेनेलियाच्या नवीन खास लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
मराठमोळ्या अंदाजात जेनेलिया अप्रतिम दिसते आहे.
केसात गजरा, कपाळी टिकली आणि गळ्यात हार असा जेनेलियाचा नवा लूक आहे.
सोशल मीडियावर जेनेलियाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.