Chetan Bodke
ईशा गुप्ता कायमच बोल्डनेस आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
'आश्रम' वेबसीरिजनंतर ईशा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
ईशा गुप्ता नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये ईशा गुप्ताने गोल्डन शेड असलेली सिंपल साडी नेसत सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.
नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने डायमंड चोकर नेकपीस आणि लहान कानातले घालून सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्री नव्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या नव्या लूकची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
सिंपल लूक असलेल्या ह्या फोटोला अल्पावधीतच हजारो लाईक्स मिळाले आहेत.
ईशाच्या कामाविषयी सांगायचे तर, ती 'मर्डर ४' मध्ये दिसणार आहे.
त्यासोबतच 'हेरा फेरी 3' आणि 'देसी मॅजिक' या चित्रपटांतही ती दिसणार असल्याची सध्या चर्चा होत आहे.