Chetan Bodke
आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही अभिनेत्री दिया मिर्झा सर्वाधिक चर्चेत राहते
दिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसोबत ती नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.
अभिनेत्री दियाला ओळखत नाही, असा व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही.
नुकतंच दियाने सोशल मीडियावर रेड कलरची फ्लोरल प्रिंट असलेली साडी परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचा हा सिंपल लूक नेटकऱ्यांना प्रचंड भावला असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सध्या सर्वत्र कौतुक आहे.
नॉर्मल मेकअप, सिल्की ओपन हेअर आणि हटके स्टाईल देत अभिनेत्रीने फोटोशूट केले आहे.
कानामध्ये झुमका, ऑक्साईड ज्वेलरी वेअर करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
कोणतेही आऊटफिट असो दिया त्या आऊटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसते.
दियाच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स वर्षाव होत असून कमेंटच्या माध्य़मातून कौतुक होत आहे.