Chetan Bodke
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या सदाबहार सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधत असते.
माधुरी दीक्षित एक प्रसिद्ध अभिनेत्री असून डान्सर आणि प्रसिद्ध निर्मात्या सुद्धा आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षितने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ब्लॅक कलरचा डिझायनिंग फॉर्मल ड्रेस परिधान केला आहे.
माधुरी दीक्षित फॉर्मल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला.
नव्या फोटोंमध्ये माधुरीने ब्लॅक कलरचा टॉप, पलाझो आणि ब्लॅक कोट त्यावर डायमंड डिझाईन केलेला दिसत आहे.
शेअर केलेल्या लूकमध्ये अभिनेत्रीच्या ड्रेसवर डायमंड डिझाईन वर्क असल्यामुळे त्या ड्रेसवर ती खूपच सुंदर दिसते.
फोटोशूटसाठी माधुरीने ग्लॉसी मेकअप केला असून केस मोकळे सोडत हेयरस्टाईल केली आहे.
धकधक गर्लच्या नव्या या फोटोंवर साडेसहा लाखांपेक्षा जास्त लाईक्स असून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.