Manasvi Choudhary
मराठी चित्रपटसृष्टीतील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर.
अमृता खानविलकरने अभिनयासह नृत्याने प्रेक्षकांची आणि चाहत्यांची मने जिंकली आहेत. या सोबत अमृता तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.
नुकतेच अमृताने तिचे काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी तिने स्कर्ट- टॉप परिधान केला आहे.
वेस्टर्न लूकमध्ये अमृताने व्हाईट वेस्टकोट आणि डिझायनर स्कर्ट परिधान केला आहे. यामध्ये तिचा लूक ग्लॅमरस दिसत आहे.
अमृताने मेकअप केला आहे. रेड लिपस्टिकमध्ये ती खूपच उठून दिसते आहे. केसांची स्टाईल केली आहे.
या हटके लूकवर तिने आकर्षक ज्वेलरी घातलीये. तिने गोल्ड प्लेटेड एअररिंग्स घातले आहेत. ब्लॅक हाय हिल्स परिधान केली आहे.
अमृताने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.