Chetan Bodke
अभिनेता प्रथमेश परबने आणि गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी थाटामाटात साखरपुडा आटोपला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रथमेशच्या आणि क्षितीजाच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली होती.
ठरल्याप्रमाणे या कपलने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवसापासून आयुष्याला एक नवी सुरुवात केली आहे.
“आमचा ‘व्हॅलेंटाईन डे’ असा साजरा झाला… इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील.” असं कॅप्शन देत प्रथमेशने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
साखरपुड्याला प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी वेअर केलेली होती.
तर क्षितीजाने जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी परिधान केली होती.
तर क्षितीजाने पैठणीला साजेसा मेकअप आणि दागिने वेअर केले होते.
या जोडप्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दोघांचीही ओळख सोशल मीडियावर झाली होती. प्रथमेशने क्षितीजाचे फोटो पाहून तिला इन्स्टाग्रामवर मॅसेज केला होता.