Siddhi Hande
अभिनेता ललित प्रभाकर हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे.
ललित प्रभाकर हा लाखो मुलींचा क्रश आहे. त्याचे जगभरात चाहते आहेत.
ललित प्रभाकरचं खरं नाव तुम्हाला माहितीये का? ललित हा त्याच्या नावापुढे प्रभाकर लावतो.
प्रभाकर हे ललितच्या वडिलांचे नाव आहे. तो आपलं आडनाव कधीच लावत नाही.
ललितचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे. तो आदराने आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावतो.
ललित प्रभाकरचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी आरपार हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
ललित अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही बोलत नाही त्यामुळेच प्रभाकर हे त्याचे आडनाव असल्याचे अनेकांना वाटते.