Shreya Maskar
आज (16 जून) बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस आहे.
मिथुन चक्रवर्ती आज 75 वर्षांचे झाले आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांनी 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटासाठी सुमारे 1.5 कोटी रुपये मानधन घेतले.
मिथुन चक्रवर्ती एका जाहिरातीसाठी जवळपास 5-10 कोटी मानधन घेतात.
मिथुन चक्रवर्ती यांचा मढमध्ये आलिशान बंगला असून मुंबईजवळील फार्महाऊस आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्याकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, टोयोटा फॉर्च्यूनर, फोर्ड एंडेवर यांचा समावेश आहे.
मिथुन चक्रवर्ती यांचे तामिळनाडूतील उटी आणि म्हैसूरमध्ये हॉटेल्स आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, मिथुन चक्रवर्ती यांची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे.