ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही तुमचे आवडते पुस्तक, बातम्या किंवा नवीन माहिती देणारी कोणतेही पुस्तक वाचा. दररोज ३० मिनिटे वाचा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी शांत मनाने उठण्यासाठी १० मिनिटे ध्यान करा.
कोडं, लॉजिक किंवा रिजनिंग गेम खेळा. यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो.
वॉक, योगा, डान्स किंवा तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम करा. यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तप्रवाह वाढतो.
ओमेगा-३ ने समृद्ध असलेले आहार घ्या. बदाम, अक्रोड, ब्रोकोली, हिरव्या भाज्या खा.
तुमच्या मनातल्या गोष्टी एका डायरीत लिहा, यामुळे आत्मविश्वास वाढतो.
नवीन भाषा, नवीन शब्द किंवा नवीन कौशल्ये शिका, यामुळे मेंदू नेहमीच सक्रिय राहतो.