Acidity : ॲसिडीटी, पोटदुखीमुळे तुमचं मुल खूप रडतंय? करा ‘हा’ घरगुती उपाय, मिनिटांत वाटेल बरे

Shreya Maskar

आरोग्य तज्ज्ञ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मुलं खाताना किंवा पिताना हवा गिळल्याने गॅस होऊ शकतो. तुमच्या मुलाला अन्न व्यवस्थित चावून खायला शिकवा. जेणेकरून गॅसचा त्रास कमी होईल.

Health Experts | pinterest

पाणी प्या

मुलांना वारंवार ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर भरपूर पाणी प्यायला द्या. यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते आणि गॅसचा धोका कमी होतो. मुलांच्या आहारात कोबी, फुलकोबी, वाटाणे आणि कांदे यांसारखे पदार्थ टाळा, कारण यामुळे गॅस होऊ शकतो.

Drink Water | pinterest

फायबरयुक्त पदार्थ

मुलाच्या आहारात शक्य तितके फायबरयुक्त पदार्थांचा समाविष्ट करा. हे निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात, ज्यामुळे गॅसचा धोका कमी होतो.

Fiber-rich Foods | pinterest

पोटाला मालिश करा

मुलांच्या पोटाला गोलाकार गतीने मालिश केल्याने अडकलेला गॅस बाहेर काढण्यास मदत होऊ शकते. मुलांना असहाय वेदना होत असतील तर त्याच्या पोटावर गरम पट्ट्या लावू शकता.

Massage the Tummy | pinterest

बडीशेप

मुलांना बडीशेप भाजून किंवा पाण्यात उकळून द्या. दिवसातून दोन ते तीन वेळा बडीशेपचे पाणी प्या. बडीशेप ही एक औषधी वनस्पती आहे. पोट फुगणे कमी होण्यास आणि आम्लपित्त टाळण्यास मदत होते.

Badishep | pinterest

कोवळ्या नारळाचे पाणी

कोवळ्या नारळाचे पाणी प्यायल्याने पचनक्रियेतील सर्व अडथळे निघून जातात. रोज अर्धा ग्लास तरी मुलांना नारळाचे पाणी द्या.

Coconut Water | pinterest

पिकलेली केळी, थंड दूध

पिकलेली केळी अल्कलाइन, पोटॅशियमने समृद्ध आहे. जे पोटाच्या अस्तरावर एक आवरण तयार करून जळजळ कमी करते.गोड नसलेले थंड दूधात कॅल्शियम असते, जे पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करते. तसेच पोटदुखी थांबवते.

Cold Milk | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात वारंवार ॲसिडीटी होते? रोज प्या 'हा' ज्यूस, गॅस अन् पोटदुखीवर मिळेल आराम

Acidity | saam tv
येथे क्लिक करा...