Shreya Maskar
अनेकांना सकाळी उठल्यावर ॲसिडीटीचा भयंकर त्रास होतो. यावर घरीच रामबाण उपाय लपलेला आहे, ज्यामुळे ॲसिडीटी आणि छातीमधील जळजळ दूर होईल.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर 'ॲसिड रिफ्लक्स'चा त्रास कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणे सर्वोत्तम उपाय आहे.
एक ग्लास पाणी प्यायल्याने पोटातील आम्लतेची पातळी (pH) संतुलित होते आणि अन्ननलिकेत राहिलेले ॲसिड खाली ढकलली जाते.
रात्रीच्या दीर्घ काळानंतर, अतिरिक्त ॲसिड तयार न होऊ देता हे पाणी पचनसंस्थेला सुरक्षितपणे कार्यरत करण्यास मदत करते.
कॉफी, चहा लिंबूवर्गीय फळांचे रस यांसारख्या सकाळी छातीत जळजळ वाढवणाऱ्या पदार्थ पिणे टाळा आणि एक ग्लास हे पाणी प्या.
तुम्ही पाण्यात कोरफडीचा रस मिसळून देखील पिऊ शकता. शुद्ध कोरफडीचा रस पोटाला थंडावा देतो. यामुळे पोटातील अंतर्गत सूज कमी होते आणि अन्ननलिकेला आराम मिळतो.
आल्यामध्ये नैसर्गिक दाहशामक गुणधर्म असतात, जे पोटातील जळजळ किंवा अस्वस्थता शांत करतात. हे पचनसंस्थेतून अन्नाची हालचाल सुरळीत करण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.