Acidity : ॲसिडीटीमुळे जुलाब होतायेत? स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ ठरेल वरदान, पोटातील गडबड झटक्यात होईल गायब

Shreya Maskar

दही

दह्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण जास्त असते, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे बॅक्टेरिया जुलाब होण्यास कारणीभूत असलेल्या वाईट बॅक्टेरियांशी लढतात. दही खाल्ल्याने पचनसंस्थाही सुधारते.

curd | pinterest

नारळाचे पाणी

जुलाबामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते . नारळाचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. नारळाचे पाणी पोटाला शांत करते आणि अन्न पचायला मदत करते.

Coconut water | pinterest

केळी

केळ्यांमध्ये पेक्टिन असते, जे आतड्यांमधील द्रव शोषण्यास मदत करते, त्यामुळे जुलाब थांबतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम असते, जे जुलाबामुळे शरीरातून कमी झालेल्या द्रवाची भरपाई करते.

banana | pinterest

जिऱ्याचे पाणी

एका पातेल्यात पाणी आणि जिरे उकळा. थंड झाल्यावर ते गाळून प्या. तुम्ही हे दिवसातून ३-४ वेळा पिऊ शकता. जिऱ्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात जे, आतड्यातील हानिकारक जीवाणूंना मारतात आणि पोटाच्या त्रासाला आराम देतात.

Cumin water | pinterest

हळद

एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद विरघळवा, ते चांगले मिसळा आणि प्या. तुम्ही हे दिवसातून २-३ वेळा पिऊ शकता. हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन, प्रतिजैविक, सूजविरोधी गुणधर्म आतड्यातील जिवाणूंशी लढण्यास अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच जुलाब, पोटदुखी आणि पोटाच्या संसर्गापासून आराम देतात.

Turmeric | pinterest

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे सुमारे १५ मिनिटे पाण्यात भिजवा. त्याची बारीक पेस्ट बनवा आणि एका ग्लास पाण्यात मिसळून प्या. मेथीमध्ये चिकट पदार्थ (म्युसिलेज ) जुलाब रोखण्यास मदत करतो.

Fenugreek seeds | pinterest

पुदिना- मध

एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा पुदिन्याचा रस, लिंबाचा रस आणि मध मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोनदा प्या. पुदिना आणि मध एकत्र मिसळल्याने पोट फुगणे आणि जुलाब कमी होण्यास मदत होते.

Mint- Honey | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : चपाती की भात, कोणता पदार्थ वाढवतो ॲसिडीटी?

Acidity | SAAM TV
येथे क्लिक करा...