Shreya Maskar
थंड दुधामुळे ॲसिडीटीपासून आराम मिळू शकतो. जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल, तर एक सफरचंद दुधासोबत ब्लेंड करून शेक बनवा. सफरचंदासोबत दालचिनीही वाटून घ्या. दालचिनीमुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल.
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. तर केळी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही खजूर, केळ आणि दूध मिक्स करून शेक बनवा.
खजूर खाल्ल्यानंतर पोटातील अतिरिक्त ॲसिड दूर होते. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे पोटातील आणि छातीत होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात.
केळीमध्ये फायबर असते, जे अन्नपचन जलद करते. यामुळे पोटात जास्त वेळ ॲसिड तयार होत नाही. त्यामुळे ॲसिडीटीचा त्रास वारंवार होत असेल तर केळी खा.
बदाम पोटातील आम्लता कमी करण्यास मदत करतात, कारण तो एक अल्कधर्मी पदार्थ आहे. जे तुमच्या पचनसंस्थेतील पीएच (pH) संतुलित ठेवते. त्यातील उच्च फायबर अतिरिक्त आम्ल शोषून घेते.
पुदिना पोटाचे स्नायू शिथिल करून, पोटाच्या आतील आवरणाला आराम देतात. आम्लपित्त कमी करते. त्यातील सक्रिय घटक, मेन्थॉल, गॅस आणि पोट फुगणे टाळण्यास मदत करतो. लिंबू पचल्यानंतर शरीरात अल्कधर्मी प्रभाव निर्माण करून आम्लपित्तावर मदत करतात.
काकडीचा रस अल्कधर्मी असतो आणि त्यात 90% पेक्षा जास्त पाणी असते. हे पोटातील अतिरिक्त ॲसिड पातळ करून आणि पचनसंस्थेला थंड करून आम्लता कमी करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.