ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक व्यक्तीला नेहमीच आपल्या घरात शांती आणि सकारात्मकता असावी अशी इच्छा असते. परंतु आपण कधीकधी नकळत काही चुका करतो ज्यामुळे घराची शांती भंग होते.
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे. असे म्हटले जाते की, घरात कोणतीही गोष्ट चुकीच्या दिशेने ठेवली तर वास्तुदोष निर्माण होतो.
अनेकांना घरात रोप लावायला आवडतात. कधीकधी लोक घरात अशी झाडे लावतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.
कोणती झाड लावल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा येते, जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कोरडे आणि वाळलेले रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि दुःख वाढते.
आजकाल लोक त्यांच्या घराला चांगला लूक देण्यासाठी बोन्सायची झाडे लावतात. परंतु, वास्तुशास्त्रानुसार, बोन्साय वनस्पती घराच्या प्रगतीत अडथळा आणते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही काटेरी किंवा निवडुंगाची झाडे लावू नयेत. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात तणाव निर्माण होतो.