Sakshi Sunil Jadhav
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ तसेच खरा व्यक्ती ओळखणारे अनुभवी गुरु आहेत.
चाणक्य म्हणतात, माणसाचं खरं स्वरुप आणि नात्यांची ताकद वाईट काळातच दिसून येते.
सुखात प्रत्येक जण हसतो, पण संकटात काहीचजण धावून येतात. तेच आपले खरे मित्र आणि खरे नातेवाईक असतात.
जे वर्षानुवर्षे तुमच्यासोबत कोणत्याही फायद्याशिवाय आहेत. हेच विश्वासू असतात.
आई-वडील, भाऊ-बहीण अशी आपली माणसं वाईट काळात नेहमीच मदतीला येतात.
जे योग्य सल्ला देऊन परिस्थितीतून बाहेर पडायला मदत करतात ती व्यक्ती योग्य मार्गदर्शक असते.
काही वेळा नवीन ओळखी संकटात मदतीला धावून येतात आणि नातं घट्ट होतं.
जे लोक मदत करताना कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत. ते विश्वासू असतात. अशांना गमवू नका.