Saam Tv
तुम्हाला माहितच असेल चाणक्यांनी माणसाला यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिला आहे.
चाणक्यांच्या मते, कधी काय बोलावे, कोणावर प्रेम करावे आणि किती राग धरावा अशा गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.
चाणक्य म्हणतात, माणसाने यशस्वी होण्यासाठी सराव करावा. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वेळ काढणे गरजेचे आहे.
तुम्हाला भविष्यात ज्या गोष्टी शिकायच्या आहेत त्या इतरांना शेअर करू नका.
यशस्वी लोक कृती करण्याकडे भर देतात. ते कोणतीही कृती करण्याआधी बोलून दाखवत नाहीत.
राग, मत्सर आणि भिती या तीन भावनांवर तुम्ही नियंत्रण मिळवले की तुम्हाला नक्की यश मिळेल.
हुशार व्यक्ती सगळ्यांचे सल्ले ऐकतात आणि कठीण वेळेत त्यांचा वापर करतात.
भविष्यात होणाऱ्या घटनांचा विचार करून त्यावर उपाय शोधणे ही एक सवय सगळे हुशार व्यक्ती नेहमीच करत असतात.
रोज वाचन आणि रोज नवीन शिकण्याची वृत्ती बुद्धीमान लोकांमध्ये असते.