Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्यांचे विचार आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्याला अनेक समस्यांमधून निघण्याची वाट दाखवू शकते.
कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मेहनतीसोबतच ऑफिसमधले वातावरण, सहकाऱ्यांचे वर्तन आणि स्पर्धांनाही सामोरं जावं लागतं. पण कधीकधी तुमचा गैरफायदा घेतला जातो. त्यावर उपाय जाणून घ्या.
ऑफिसमध्ये प्रत्येक गोष्टीवर लगेच उत्तर देणं टाळा. शांत राहून योग्य वेळी बोलल्याने तुमची शिस्त दिसून येते आणि अनावश्यक वाद कमी होतात.
सर्वांशी नम्रपणे वागा, पण कोणावरही विचार न करता विश्वास ठेवू नका. कोणालाही पर्सनल गोष्टी सांगू नका.
ऑफिसमध्ये प्रत्येकजण तुमचा हितचिंतक असेलच असं नाही. त्यामुळे वैयक्तिक अडचणी किंवा कमकुवत बाजू प्रत्येकासमोर मांडणं टाळा.
ई-मेल, संदेश किंवा महत्त्वाच्या सूचना नेहमी जतन करून ठेवा. भविष्यात कोणताही गैरसमज झाल्याने हे पुरावे तुमच्या मदतीला येऊ शकतात.
यश मिळवण्यासाठी चुकीचे मार्ग स्वीकारण्यापेक्षा सचोटीने काम करा. त्याने कमी वेळात प्रामाणिक व्यक्तीवरच वरिष्ठ आणि सहकारी विश्वास ठेवतात.
प्रत्येक परिस्थितीत भावनिक होण्याऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्या. संयम आणि योग्य नियोजनामुळे कठीण प्रसंगही सहज हाताळता येतात.