Sakshi Sunil Jadhav
टाइप २ मधुमेह असलेल्या अनेकांना चिंच खाल्ल्याने साखर वाढेल अशी भीती वाटते. पण मर्यादित प्रमाणात चिंच खाल्ल्याने ती रक्तातली साखर झपाट्याने वाढवत नाही.
चिंचेला ग्लायसेमिक इंडेक्स (GI) २३ असल्यामुळे ती लो-जीआय अन्नपदार्थांमध्ये मोडते. त्यामुळे शरीरात ग्लुकोज हळूहळू सोडले जाते.
चिंचेमध्ये भरपूर फायबर असतात. त्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
चिंचेमध्ये व्हिटॅमिन B समूह, व्हिटॅमिन C, K, फोलेट तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांसारखी खनिजे असतात. ही शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते.
चिंचेमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातले दाह कमी होण्यास आणि पेशींचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.
काही प्राण्यांवरील संशोधनात चिंचेच्या बियांच्या अर्कामुळे टाइप - २ डायबेटीजमध्ये रक्तातली साखर कमी होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे.
वाळवून तयार केलेल्या चिंचेच्या बियांची पावडर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित प्रमाणात घेता येते.
जास्त साखर असलेली चिंचेची चटणी, कँडी किंवा बाजारातील गोड पदार्थ टाळा. कारण त्यामधील जास्तीची साखर डायबेटीजसाठी हानिकारक ठरू शकते.
ही माहिती सर्वसाधारण आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणताही नवीन आहार किंवा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.